व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागे राहा!

कोव्हिडमुळे ६० लाख लोकांचा मृत्यू​—बायबल काय म्हणतं?

कोव्हिडमुळे ६० लाख लोकांचा मृत्यू​—बायबल काय म्हणतं?

 जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालानुसार २३ मे २०२२ पर्यंत ६२ लाख ७० हजार लोकांचा कोव्हिड-१९ या महामारीमुळे मृत्यू झालाय. पण ५ मे २०२२ ला प्रकाशित झालेल्या एका बातमीमध्ये असं म्हटलं होतं, की जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मृत्यू झालेल्यांची संख्या वाटते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. त्यात असं म्हटलं होतं, की २०२० आणि २०२१ या वर्षांदरम्यान, “कोव्हिड-१९ मुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मृत्यू झालेल्यांची संख्या ही जवळपास १ कोटी ४९ लाख इतकी जास्त आहे!” अशा भयंकर आणि दुखःद घटनांबद्दल बायबलमध्ये काही सांगितलंय का?

बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं की महामाऱ्‍या येतील

  •    येशूने भविष्यवाणी केली होती, की “शेवटच्या दिवसांत” “रोगांच्या साथी” म्हणजे महामाऱ्‍या येतील.—लूक २१:११; २ तीमथ्य ३:१.

 येशूची ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी, “जगाचा अंत कधी होईल?” हा लेख पाहा.

बायबल आपल्याला सांत्वन देतं

  •    “सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव . . . आपल्या सगळ्या संकटांमध्ये आपलं सांत्वन करतो.”—२ करिंथकर १:३, ४.

 ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय त्यांपैकी अनेकांना बायबलमधून सांत्वन मिळालंय. आणखी माहितीसाठी हे लेख पाहा: “दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता?” आणि “शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत.

बायबलमध्ये अशा परिस्थितींसाठी कायमचा उपाय सांगितलाय

  •    “तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.”—मत्तय ६:१०.

 लवकरच “देवाचं राज्य” या पृथ्वीवर राज्य करेल आणि तेव्हा, “‘मी आजारी आहे,’ असं देशातला एकही रहिवासी म्हणणार नाही.” (मार्क १:१४, १५; यशया ३३:२४) देवाच्या या राज्याबद्दल आणि ते या पृथ्वीवर कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करणार आहे त्याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी “देवाचं राज्य काय आहे?” हा व्हिडिओ पाहा.

 बायबलमध्ये दिलेल्या माहितीचा आणि अभिवचनांचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.