व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

YURI LASHOV/AFP via Getty Images

जागे राहा!

ख्रिस्ती लोकांनी युद्धात भाग घेतला पाहिजे का?—बायबल काय म्हणतं?

ख्रिस्ती लोकांनी युद्धात भाग घेतला पाहिजे का?—बायबल काय म्हणतं?

 युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून हे दिसून आलंय की बरेच ख्रिस्ती धर्मगुरू या युद्धाला पाठिंबा देत आहेत. दोन्ही देशांच्या चर्चमधले पाळक युद्धाला कसं समर्थन देत आहेत हे पुढे दिलेल्या विधानांवरून स्पष्ट होतं:

  •   “युक्रेनचे योद्धे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जो लढा देत आहेत त्यासाठी आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि त्यांचे आभारी आहोत. . . . आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना नेहमी तुमच्यासोबत आहेत. तसंच, तुम्हाला नेहमी आमचा पाठिंबा राहील.”—मेट्रोपोलिटन एफिफॅनियस पहिले, क्यीव. १६ मार्च २०२२, द जेरूसलेम पोस्ट.

  •   ‘रशियाची युक्रेनवर लष्करी कारवाई चालू असताना, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चेच्या प्रमुख पाळकांनी रविवारी चर्चमध्ये रशियाच्या सैनिकांसाठी एक खास सभा भरवली. त्यात त्यांनी आव्हान केलं की सैनिकांनी आपल्या देशाचं रक्षण करावं. कारण फक्‍त तेच हे करू शकतात.’—३ एप्रिल २०२२, रॉयटर्स.

 ख्रिस्ती लोकांनी युद्धात भाग घेतला पाहिजे का? बायबल काय म्हणतं?

बायबल नेमकं काय म्हणतं?

 बायबलमध्ये सांगितलंय की येशूचे खरे शिष्य कधीही युद्धात भाग घेत नाहीत.

  •   “आपली तलवार जागच्या जागी ठेव, कारण जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.”—मत्तय २६:५२.

     जी व्यक्‍ती युद्धाचं समर्थन करते किंवा त्यात भाग घेते ती खरंच येशूच्या या आज्ञेचं पालन करत आहे असं म्हणता येईल का?

  •   “मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा. तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”—योहान १३:३४, ३५.

     येशूने सांगितलं की त्याच्या शिष्यांचं ओळखचिन्हं म्हणजे ‘एकमेकांवरचं प्रेम’. मग युद्धाचं समर्थन करणारी किंवा त्यात भाग घेणारी व्यक्‍ती खरंच तसं प्रेम दाखवत असेल का?

 जास्त माहितीसाठी, “ख्रिश्‍चनांनी युद्धात भाग घेतला पाहिजे का?” हा इंग्रजीतला लेख वाचा.

आजच्या काळातली युद्धं आणि खरे ख्रिस्ती

 युद्धाचं समर्थन करण्यापासून आणि त्यात भाग घेण्यापासून दूर राहणं खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खरंच शक्य आहे का? हो. बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं की आपल्या काळात, म्हणजेच ‘शेवटच्या दिवसांत’ येशूच्या शिकवणींप्रमाणे चालणारे अनेक लोक असतील. बायबल म्हणतं, वेगवेगळ्या राष्ट्रांतून आलेले हे लोक ‘युद्ध करायला शिकणार नाहीत.’—यशया २:२,.

 लवकरच “शांतीचा देव” यहोवा a त्याचं राज्य या पृथ्वीवर स्थापन करेल आणि लोकांची “अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.”—फिलिप्पैकर ४:९; स्तोत्र ७२:१४.

a बायबलमध्ये देवाचं नाव ‘यहोवा’ असं दिलं आहे.—स्तोत्र ८३:१८.