व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Kim Steele/The Image Bank via Getty Images

खास मोहीम

पैशांची अडचण—देवाचं राज्य याबद्दल काय करेल?

पैशांची अडचण—देवाचं राज्य याबद्दल काय करेल?

 जगातल्या बऱ्‍याच लोकांना रोजच्या गरजा भागवणं कठीण झालंय. आणि दिवसेंदिवस ही समस्या वाढतच चालली आहे.

  •   अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका जागतिक रिपोर्टप्रमाणे a असं दिसून आलंय, की “लोकांच्या हातात मिळणारा पगार खूप कमी झालाय.” त्यात असं ही सांगण्यात आलं होतं, लवकरच काही हालचाल केली नाही तर “गरीब-श्रीमंत यांच्यातलं अंतर आणखी वाढत जाईल.” तसंच, “कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना रोजचं जीवन जगणं अजून कठीण होईल.”

 जगभरात असलेल्या पैशांच्या या अडचणीवर सरकारांकडे काही उपाय आहे का? किंवा त्यांना ती पूर्णपणे काढून टाकता येईल का?

 बायबल सांगतं की असं एक सरकार आहे जे पैशांची अडचण आणि गरीब-श्रीमंत यांच्यातलं अंतर काढू शकतं. आणि ते लवकरच असं करणार आहे. त्यात असं सांगितलंय की, ‘स्वर्गाचा देव एक राज्य स्थापन करेल.’ ते पृथ्वीवर होणाऱ्‍या सगळ्या गोष्टींवर देखरेख करेल. (दानीएल २:४४) ते सरकार जेव्हा राज्य करेल तेव्हा कोणाकडेही दुर्लक्ष केलं जाणार नाही. (स्तोत्र ९:१८) लोकांना खूश राहण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची गरज आहे, त्या सगळ्या देवाचं राज्य पुरवेल. सगळ्यांना त्यांच्या मेहनतीचा चांगला मोबदला मिळेल.—यशया ६५:२१,२२.

a आंतराष्ट्रीय कामगार संघटनेचा २०२२-२३ चा जागतिक वेतन रिपोर्ट