व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागे राहा!

जगभरात होणाऱ्‍या गोळीबारांच्या धक्कादायक घटना—बायबल काय म्हणतं?

जगभरात होणाऱ्‍या गोळीबारांच्या धक्कादायक घटना—बायबल काय म्हणतं?

 जुलै २०२२ मध्ये जगभरात घडलेल्या गोळीबारांच्या धक्कादायक घटना:

  •   “जपानच्या लोकप्रिय नेत्याच्या [माजी पंतप्रधान शिन्जो आबे] हत्येमुळे संपूर्ण देश हादरून गेला आणि जगभरात शोककळा पसरली. विशेष म्हणजे, जपानमध्ये हिंसेचं आणि गुन्हेगारीचं प्रमाण कमी असताना आणि बंदूक जवळ ठेवण्याबद्दल कडक कायदे असतानाही असं घडलं.”—१० जुलै २०२२, द जपान टाईम्स.

  •   “डेन्मार्कमधल्या कोपनहेगन शहरात शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबारात तीन ठार. संपूर्ण देश हादरला.”—४ जुलै २०२२, रॉयटर्स.

  •   “दक्षिण आफ्रिका: सोवेटो टाऊनशिपमधल्या बारमध्ये काही जणांनी केलेल्या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू.”—१० जुलै २०२२, द गार्डियन.

  •   “अमेरिकेत ४ जुलै आणि त्याच्या आदल्या दोन दिवसांत झालेल्या गोळीबारांच्या घटनांमध्ये २२० पेक्षा जास्त लोक ठार.”—५ जुलै २०२२, सीबीएस न्यूज.

 अशा प्रकारच्या हिंसक घटना कधी थांबतील का? बायबल काय म्हणतं?

हिंसेला कायमचा पूर्णविराम

 आपण सध्या ज्या काळात जगतोय त्याला बायबल ‘शेवटचे दिवस’ असं म्हणतं. बायबलमध्ये सांगितलं होतं, की या काळात लोकांचं वागणं अतिशय हिंसक, निर्दयी आणि क्रूर असेल. (२ तीमथ्य ३:१,) आणि यामुळेच आजकाल लोकांच्या मनात सतत भीती असते. (लूक २१:११) पण त्याच वेळी बायबलमध्ये देवाने असंही वचन दिलंय, की असा एक काळ येईल जेव्हा कोणीही हिंसा करणार नाही आणि “लोक नेहमी शांतीच्या निवासस्थानात राहतील, जिथे शांती आणि विसावा मिळेल अशा सुरक्षित ठिकाणी ते राहतील.” (यशया ३२:१८) पण हिंसेला कायमचा पूर्णविराम कसा मिळेल?

 देव वाईट लोकांचा आणि सगळ्या शस्त्रांचा नाश करेल.

  •   “दुष्ट लोकांचा पृथ्वीवरून नाश केला जाईल.”—नीतिवचनं २:२२.

  •   [देव] सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत करतो. तो धनुष्यं मोडून टाकतो आणि भाले तोडून टाकतो. तो लढाईचे रथ आगीत जाळून टाकतो.”—स्तोत्र ४६:९.

 देव लोकांना शांतीने राहायला शिकवेल आणि असं करून तो हिंसेची मूळ कारणंच नाहीशी करेल.

  •   “माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते कोणालाही त्रास देणार नाहीत, किंवा कोणतंही नुकसान करणार नाहीत. कारण जसा समुद्र पाण्याने भरलेला आहे, तशी संपूर्ण पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरून जाईल.”—यशया ११:९.

  •   आजसुद्धा देव लोकांना हिंसेचा मार्ग आणि शस्त्रं वापरायचं सोडून द्यायला आणि एकमेकांसोबत शांतीने राहायला शिकवत आहे. तो जसं काय, त्यांना ‘आपल्या तलवारी ठोकून नांगरांचे फाळ बनवायला आणि आपल्या भाल्यांपासून कोयते बनवायला’ शिकवत आहे.—मीखा ४:३.

 कोणालाही कसलीही भीती नसेल अशा जगाबद्दल बायबल जे वचन देतं त्याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी इंग्रजीतला हा लेख पाहा: “फ्रीडम फ्रॉम फियर—इज इट पॉसिबल?

 जगातून हिंसा कायमची कशी नाहीशी होईल याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी हा लेख पाहा: “सरतेशेवटी पृथ्वीवर शांती!