भ्रष्ट नेते—देवाचं राज्य याबद्दल काय करेल?
लोक भ्रष्ट नेत्यांना कंटाळले आहेत. त्यांना असे नेते हवे आहेत, ज्यांच्यावर ते भरवसा ठेवू शकतात. २०२३ मध्ये जगभरात घेतलेल्या सर्व्हेप्रमाणे लोकांचा सरकारी नेत्यांवर सगळ्यात कमी भरवसा आहे. a
बायबल एका अशा सरकाराबद्दल सांगतं ज्याचा नेता भ्रष्ट नाही, तर प्रामाणिक आहे आणि त्याच्यावर सगळेच भरवसा ठेवू शकतात. ते सरकार म्हणजे देवाचं राज्य आणि त्याचा नेता म्हणजे येशू ख्रिस्त आहे.—यशया ९:७.
येशूला लोकांची काळजी आहे, हे त्याने त्याच्या कामांतून दाखवून दिलं. (मत्तय ९:३५,३६) जे लोक त्याचं नेतृत्व स्वीकारतील ते भविष्यात त्याच्या राज्यात शांतीने राहू शकतील. कारण त्याच्या राज्यात कोणताही अन्याय नसेल.—स्तोत्र ७२:१२-१४.
a २०२३ चा एडलमन ट्रस्ट बॅरोमिटर ग्लोबल रिपोर्ट.