व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागे राहा!

जगभरात वाढती महागाई—बायबल काय म्हणतं?

जगभरात वाढती महागाई—बायबल काय म्हणतं?

 “जगाची आर्थिक व्यवस्था पुन्हा एकदा धोक्यात आली आहे,” असा इशारा वर्ल्ड बॅंक ग्रुपच्या अध्यक्षांनी आपल्या जून २०२२ च्या अहवालात दिला. त्यात पुढे म्हटलंय, “एकीकडे महागाई खूप वाढतेय, पण लोकांची कमाई कमी झाली आहे.”

 “अन्‍नधान्याचे आणि इंधनाचे भाव आकाशाला भिडत चालले आहेत. आणि याचा सर्वात मोठा फटका गरीब देशांमध्ये राहणाऱ्‍या लोकांना बसत आहे,” असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF या संस्थेने म्हटलं आहे.

 अशा कठीण आर्थिक समस्या का येत आहेत, आपण त्यांचा सामना कसा करू शकतो आणि त्या कायमच्या कशा काढून टाकल्या जातील, हे समजून घ्यायला बायबल आपल्याला मदत करतं.

“शेवटच्या दिवसांत” वाढती महागाई

  •   बायबल म्हणतं, की आपण “शेवटच्या दिवसांत” राहत आहोत.—२ तीमथ्य ३:१

  •   येशूने सांगितलं होतं, की या काळात “भयानक दृश्‍यं” दिसतील किंवा घाबरवून टाकणाऱ्‍या घटना घडतील. (लूक २१:११) वाढत्या महागाईमुळे लोकांमध्ये भीती पसरते. त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागते आणि कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्‍न पडतो.

  •   बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलं होतं, की या काळात अन्‍नधान्याचे भाव वाढतील. त्यात म्हटलं होतं, ‘मग, मला . . . एक आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “एका दिवसाच्या मजुरीला एक माप गहू आणि तीन मापं जव.”’—प्रकटीकरण ६:६, तळटीप.

 या ‘शेवटच्या दिवसांबद्दल’ आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या भविष्यवाणीबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी, १९१४ पासून जगाचं बदललेलं चित्र हा व्हिडिओ पाहा आणि चार घुड़सवार—ये कौन हैं? हा लेख वाचा.

सगळ्या आर्थिक समस्या कायमच्या कशा दूर होतील?

  •   “ते घरं बांधतील आणि त्यांत राहतील, ते द्राक्षांचे मळे लावतील आणि त्यांचं फळ खातील. त्यांनी बांधलेल्या घरांत दुसरे येऊन राहतील, असं कधीही होणार नाही. आणि त्यांनी लावलेल्या द्राक्षमळ्यांचं फळ दुसरे खातील, असं कधीही होणार नाही.”—यशया ६५:२१, २२.

  •   “पृथ्वी भरपूर उपज देईल; पर्वतांच्या शिखरांवरही पुष्कळ धान्य उगवेल.”—स्तोत्र ७२:१६.

  •   “दीनदुबळ्यांवर जुलूम होत आहेत; गोरगरीब उसासे टाकत आहेत; म्हणून, मी उठून कारवाई करीन. . . . असं यहोवा म्हणतो.”—स्तोत्र १२:५. a

 देव फक्‍त एका देशातल्याच नाही तर संपूर्ण जगातल्या अन्यायी आर्थिक व्यवस्थेचा लवकरच अंत करेल. हे कसं होणार आहे हे जाणून घेण्यासाठी, “जगातील गरिबी कधी नाहीशी होईल का?” हा लेख वाचा.

 पण आजसुद्धा, बायबल तुम्हाला वाढत्या महागाईचा सामना करायला मदत करू शकतं. ते कसं? आपण पैसा जपून कसा वापरू शकतो याविषयी बायबलमध्ये व्यावहारिक सल्ले दिलेले आहेत. (नीतिवचनं २३:४, ५; उपदेशक ७:१२) याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी, “पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा” आणि “कम पैसों में कैसे करें गुज़ारा?” हे लेख वाचा.

a यहोवा हे देवाचं नावं आहे.—स्तोत्र ८३:१८.