व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Chris McGrath/Getty Images

खास मोहीम

युद्ध—देवाचं राज्य याबद्दल काय करेल?

युद्ध—देवाचं राज्य याबद्दल काय करेल?

 जगभरात युद्धांमुळे खूप भयंकर परिणाम पाहायला मिळत आहेत. आणि यांमुळे लोकांना खूप त्रास आणि दुःख सहन करावं लागतंय. काही बातम्या पाहा:

  •   “नवीन आकडेवारीवरून हे दिसून येतं की मागच्या २८ वर्षांमध्ये संघर्ष आणि युद्धांमध्ये जितके लोक मारले गेलेत, त्यांपेक्षा कितीतरी जास्त लोक अलिकडे झालेल्या संघर्षांमुळे मेले आहेत. खासकरून इथियोपिया आणि युक्रेनमधल्या युद्धांमध्ये.”—पिस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लो, ७ जून २०२३.

  •   २०२२ मध्ये जगभरात अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्ध झाले. युक्रेनचं युद्ध हे त्यांपैकीच एक आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये राजकीय संघर्षांमुळे झालेल्या हिंसाचारात २७% वाढ झाली. आणि याचा जवळजवळ १७० करोड लोकांवर परिणाम झाला.”—द आर्म्ड कॉनफ्लिक्ट लोकेशन ॲन्ड इवेंट डेटा प्रोजेक्ट (ACLED), ८ फेब्रुवारी २०२३.

 बायबलमधून आपल्याला आशा मिळते. त्यात म्हटलंय: “स्वर्गाचा देव एक असं राज्य स्थापन करेल ज्याचा कधीही नाश होणार नाही.” (दानीएल २:४४) बायबल सांगत, देव या राज्याचा म्हणजेच स्वर्गातल्या सरकाराचा उपयोग करून ‘सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत’ करेल.—स्तोत्र ४६:९.