व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Ahmad Gharabli/AFP via Getty Images

जागे राहा!

जगातली राष्ट्रं एकत्र येऊन हवामान बदलाचं संकट टाळू शकतात का?—बायबल काय म्हणतं?

जगातली राष्ट्रं एकत्र येऊन हवामान बदलाचं संकट टाळू शकतात का?—बायबल काय म्हणतं?

 रविवार, २० नोव्हेंबर २०२२ ला, संयुक्‍त राष्ट्रसंघाची २७ वी जागतिक हवामान बदल परिषद झाली. ही परिषद, ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (COP27) या नावाने ओळखली जाते. विकसनशील आणि अविकसित देशांना नैसर्गिक विपत्तींचा चांगल्या प्रकारे सामना करता यावा म्हणून त्यांना आर्थिक मदत देण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आला. पण यामुळे मूळ समस्या सुटणार नाही असं अनेकांचं मत आहे.

  •   ‘तोटा आणि नुकसान’ हा विशेष निधी उभा करायला माझी सहमती आहे. पण फक्‍त एवढंच करून चालणार नाही . . . आपला पृथ्वीग्रह अजूनही इमर्जन्सी रूममध्ये आहे,” असं संयुक्‍त राष्ट्रसंघाचे महासचिव ॲन्टोनियो ग्युटारेश यांनी २० नोव्हेंबर २०२२ ला झालेल्या या परिषदेत म्हटलं.

  •   “सध्या जग हवामान बदलाच्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे,” असं आयर्लंडच्या माजी राष्ट्रअध्यक्ष तसंच संयुक्‍त राष्ट्रसंघ मानवी हक्कांच्या माजी उच्चायुक्‍त, मेरी रॉबीन्सन यांनी २० नोव्हेंबर २०२२ ला म्हटलं.

 आजच्या युवा पिढीला खासकरून आपल्या पृथ्वीग्रहाच्या भविष्याबद्दल खूप चिंता आहे. पण जगातली राष्ट्रं एकत्र येऊन हवामान बदलाचा हा प्रश्‍न सोडवण्याचं आपलं आश्‍वासन खरंच पूर्ण करू शकतील का? बायबल याबद्दल काय सांगतं?

राष्ट्रं एकत्र मिळून हा प्रश्‍न सोडवू शकतील का?

 बायबलमध्ये जे सांगितलंय त्यावरून दिसून येतं, की हवामान संकटाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकांनी प्रामाणिकपणे कितीही परिश्रम घेतले, तरी त्यात त्यांना खूप कमी यश मिळेल. याची दोन कारणं विचारात घ्या:

  •   “जे वाकडं आहे, ते सरळ केलं जाऊ शकत नाही.”—उपदेशक १:५.

     याचा अर्थ: मानवांना मूळात शासन करण्यासाठी बनवलंच नव्हतं. त्यामुळे मानवी सरकारांची इच्छा असूनही ते या गोष्टी करू शकत नाहीत. (यिर्मया १०:२३) सगळी राष्ट्रं एकत्र आली आणि त्यांनी कितीही परीश्रम घेतले, तरी जगातल्या समस्या ते पूर्णपणे सोडवू शकणार नाहीत.

  •   ‘लोक फक्‍त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे आणि कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे असतील.’—२ तीमथ्य ३:२, ३.

     याचा अर्थ: बायबलमध्ये अगदी अचूकपणे अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे, की आपल्या काळात बरेच लोक स्वार्थी होतील आणि इतरांचं भलं करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला तयार नसतील.

आशेचा किरण!

 आपल्या पृथ्वीग्रहाचं भविष्य मानवी सरकारांनी दिलेल्या आश्‍वासनांवर अवलंबून नाही. त्याऐवजी जगावर शासन करण्यासाठी देवाने एका योग्य व्यक्‍तीला, म्हणजे येशू ख्रिस्ताला निवडलंय. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं:

  •   “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्‌भुत सल्लागार, शक्‍तिशाली देव, सर्वकाळचा पिता आणि शांतीचा राजकुमार म्हटलं जाईल.”—यशया ९:६.

 येशू हा देवाच्या राज्याचा, म्हणजे स्वर्गीय सरकाराचा राजा आहे. (मत्तय ६:१०) पृथ्वी आणि त्यावर राहणाऱ्‍या लोकांची काळजी घेण्यासाठी लागणारी ताकद, बुद्धी आणि इच्छा त्याच्याकडे आहे. (स्तोत्र ७२:१२, १६) त्याचं हे स्वर्गीय सरकार कोणालाही “पृथ्वीचा नाश” करू देणार नाही. उलट ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा चांगला बदल घडवून आणेल.—प्रकटीकरण ११:१८; यशया ३५:१, ७.

 हवामान बदलचा प्रश्‍न कायमचा कसा सोडवला जाईल याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी “धरती के भविष्य की बागडोर—किसके हाथों में?” हा लेख पाहा.