व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Pawel Gluza/500Px Plus/Getty Images

जागे राहा!

मागच्या ५० वर्षांत वन्यजीवनात ७३ टक्के घट—⁠बायबल काय म्हणतं?

मागच्या ५० वर्षांत वन्यजीवनात ७३ टक्के घट—⁠बायबल काय म्हणतं?

 ९ ऑक्टोबर २०२४ ला ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ (WWF) या संघटनेने वन्यजीवनावर मानवांमुळे झालेल्या परिणामांबद्दल एक चिंताजनक अहवाल सादर केला. त्यात असं म्हटलंय, की “गेल्या ५० वर्षांमध्ये (१९७०-२०२०) प्राण्यांच्या संख्येत सरासरी ७३ टक्क्यांनी घट झाली आहे.” त्यामुळे या अहवालात असा इशारा देण्यात आलाय: “पुढच्या पाच वर्षांमध्ये जे काही घडेल त्यावर पृथ्वीवरच्या सजीवांचं भविष्य अवलंबून आहे, असं म्हणणं अतिशयोक्‍ती ठरणार नाही.”

 हा अहवाल बऱ्‍याच लोकांसाठी धक्कादायक होता. कारण आपल्या सगळयांचंच आपल्या सुंदर पृथ्वीवर प्रेम आहे. आणि त्यावरच्या वन्यजीवनाला धोका निर्माण व्हावा असं कोणालाच वाटत नाही. आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं, कारण आपण प्राण्यांची देखभाल करावी ही भावना देवानेच आपल्यात टाकली आहे.—उत्पत्ती १:२७, २८; नीतिवचनं १२:१०.

 पण खरंच ‘पृथ्वीवरच्या वन्यजीवनाचं संरक्षण आपल्याला करता येईल का? आणि याबद्दल बायबल काय म्हणतं?’ असे प्रश्‍न कदाचित आपल्या मनात येतील.

भविष्यासाठी काही आशा आहे का?

 आपण वन्यजीवनाचं संरक्षण करायचा कितीही प्रयत्न केला, तरी खऱ्‍या अर्थाने फक्‍त देवच त्यांचं संरक्षण करू शकतो. बायबलमधल्या प्रकटीकरण ११:१८ या वचनात भविष्याबद्दल असं म्हटलंय, की देव “पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश” करणार आहे. या वचनातून आपल्याला दोन गोष्टी समजतात:

  1.  १. देव लोकांना या पृथ्वीचा पूर्णपणे नाश करू देणार नाही.

  2.  २. त्यासाठी देव लवकरच पाऊल उचलेल. हे आपल्याला कसं कळतं? कारण मानवांद्वारे पृथ्वीवरचं वन्यजीवन नष्ट होण्याची शक्यता इतिहासात पूर्वी कधी नव्हती इतकी आज आहे.

 मग ही समस्या देव कशी सोडवेल? तो त्याच्या स्वर्गातल्या सरकाराचा किंवा राज्याचा वापर करून संपूर्ण पृथ्वीवर शासन करेल. (मत्तय ६:१०) आणि हे सरकार देवाची आज्ञा पाळणाऱ्‍या मानवांना पृथ्वीवरच्या वन्यजीवनाचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी लागणारं प्रशिक्षण देईल.—यशया ११:९.