व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

डावीकडे: इयान चक्रीवादळ, फ्लोरीडा, अमेरिका, सप्टेंबर २०२२ (Sean Rayford/Getty Images); मध्ये: एक आई आपल्या मुलाला घेऊन युद्ध चालू असलेल्या ठिकाणाहून निघत आहे, डोनेटस्क, युक्रेन, जुलै २०२२ (Alex Chan Tsz Yuk/SOPA Images/LightRocket via Getty Images); उजवीकडे: मोठ्या प्रमाणावर कोव्हिड चाचणी, बीजिंग, चीन, एप्रिल २०२२ (Kevin Frayer/Getty Images)

जागे राहा!

२०२२: समस्यांनी भरलेलं वर्ष—बायबल काय म्हणतं?

२०२२: समस्यांनी भरलेलं वर्ष—बायबल काय म्हणतं?

 संपूर्ण २०२२ वर्षामध्ये आपल्याला युद्ध, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक विपत्त्यांबद्दलच बातम्यांमध्ये खूप ऐकायला मिळालं. पण फक्‍त बायबलच या गोष्टींमागची मूळ कारणं आपल्याला सांगू शकतं.

२०२२ मध्ये घडलेल्या गोष्टींमागचा खरा अर्थ

 बायबल आपल्या काळाला ‘शेवटचे दिवस’ असं म्हणतं. (२ तीमथ्य ३:१) हे दिवस १९१४ मध्ये सुरू झाले. बायबल आपल्या दिवसांबद्दल जे सांगतं ते अगदी खरंय हे अलीकडेच घडलेल्या घटनांवरून कसं दिसून येतं ते पाहा.

 ‘लढाया’​—मत्तय २४:६.

  •   “२०२२ मध्ये युरोपमध्ये युद्धाचे काळे ढग पुन्हा परतले”. a

 हा लेखसुद्धा पाहा: “रशियाचा युक्रेनवर हल्ला.”

 ‘दुष्काळ’​—मत्तय २४:७.

  •   “२०२२: कधी नव्हे इतका भयानक दुष्काळ.” b

 ‘रोगांच्या साथी’​—लूक २१:११.

  •   “पोलिओने पुन्हा आपलं डोकं वर काढलंय, मंकीपॉक्स वाढतोय आणि कोरोनामुळे अजूनही लोकांचा जीव जातोय. स्पष्टच आहे की संसर्गजन्य रोग खूप भयानक आहेत आणि यामुळे संपूर्ण मानवजात अगदीच हतबल झाली आहे.” c

 ‘भयानक दृश्‍यं’​—लूक २१:११.

  •   “उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, जंगलातील आग आणि पूर. २०२२ हे वर्ष जगभरात झालेल्या अगणित नैसर्गिक विपत्तींमुळे लक्षात राहील. यामुळे खूप नुकसान झालं, लाखो लोकांचा जीव गेला आणि कितीतरी बेघर झाले.” d

 हा लेखसुद्धा पाहा: “जगभरातल्या तापमानात भीषण वाढ.

 ‘दंगली’ [किंवा, ‘अराजकता; बंड.’ तळटीप.]​—लूक २१:९.

  •   “आर्थिक समस्यांमुळे लोक खूप संतापले आहेत. खासकरून वाढत्या महागाईमुळे. यामुळे २०२२ मध्ये लोकांनी अनेकदा सरकारांविरुद्ध मोठमोठी आंदोलनं पुकारली.” e

 हा लेखसुद्धा पाहा: “जगभरात वाढती महागाई.

आता पुढच्या वर्षी काय?

 २०२३ मध्ये नेमकं काय होईल हे आता सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र अगदी खात्रीने आपण सांगू शकतो की देवाचं राज्य किंवा स्वर्गातलं सरकार पृथ्वीवर बदल घडवून आणेल. (दानीएल २:४४) देवाचं सरकार, मानवांना सहन कराव्या लागणाऱ्‍या दुःख-त्रासाचं मूळ कारण काढून टाकेल आणि पृथ्वीसाठी असलेली देवाची इच्छा पूर्ण करेल.​—मत्तय ६:९, १०.

 आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो की जगभरात घडत असलेल्या घटना बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण करत आहेत ते पाहा. आणि येशूने दिलेल्या सल्ल्याचं पालन करून “जागे राहा.” (मार्क १३:३७) बायबलमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आज कसा फायदा होऊ शकतो आणि भविष्यासाठी कशी चांगली आशा मिळू शकते हे जाणून घेण्यासाठी कृपया यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा.

a एपी न्यूज, “२०२२ साली युरोपमध्ये युद्धाचे काळे ढग पुन्हा परतले,”​—जील लॉलेस, ८ डिसेंबर २०२२.

b वर्ल्ड फूड प्रोग्राम, “जागतिक अन्‍न टंचाई.”

c जेएएमए हेल्थ फोरम, “जागतिक माहामारीच्या काळात जगणं​—कोव्हिडपासून मंकीपॉक्स, पोलिओ आणि डिझिझ एक्सपर्यंत”​—लॉरेंस गॉसटीन, जेडी, २२ सप्टेंबर २०२२.

d Earth.Org, “२०२२ सालात जगभरातल्या तापमानात झालेल्या भीषण वाढीमागचं कारण काय?”​—मार्टिना इगिनी, २४ ऑक्टोबर २०२२.

e कार्नेजी एन्डावमेंट फॉर इंटरनॅशनल पिस, “अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे २०२२ मध्ये जगभरात जागोजागी संतप्त निदर्शनं”​—थॉमस कॅरोथर्स आणि बेंजामिन फेल्डमन, ८ डिसेंबर २०२२.