जागे राहा!
२०२३: लोकांसाठी चिंतेचं वर्ष—बायबल काय म्हणतं?
आपण जर २०२३ मध्ये जगभरात घडलेल्या घटना पाहिल्या तर आपल्याला हा स्पष्ट पुरावा मिळतो की आपण बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे “शेवटच्या दिवसांत” जगतोय. (२ तीमथ्य ३:१) बायबलमध्ये सांगितल्या होत्या, अगदी तशाच घटना आपल्या काळात कशा घडतायत ते पुढे पाहा.
बायबल आणि जगात घडणाऱ्या घटना
“लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या.” —मत्तय २४:६.
“जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी युद्धं आणि हिंसाचार वाढतोय.” a
jw.org वर “हू विल सेव द सिविलियन्स?” आणि “वर्ल्ड मिलिटरी स्पेंडिंग सरपासेझ २ ट्रिलियन” हे इंग्रजीतले लेख पाहा.
“ठिकठिकाणी भूकंप होतील.” —मार्क १३:८.
“२०२३ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत, जगभरात रिक्टर स्केलवर ७ तीव्रतेचे १३ भूकंप झालेत. जेव्हापासून भूकंपांची तीव्रता मोजण्यात येऊ लागली, तेव्हापासूनचे हे सर्वात जास्त आकडे आहेत.” b
jw.org वर “टर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप” हा लेख पाहा.
“भयानक दृश्यं.”—लूक २१:११.
“ग्लोबल वॉर्मिंगचा नाही तर आता ग्लोबल बॉयलिंगचा [उकळण्याचा] काळ सुरू झालाय.”—ॲन्टोनियो गुटेरेज, संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस. c
jw.org वर “समर २०२३ ग्लोबल हीट वेव” हा इंग्रजीतला लेख पाहा.
“ठिकठिकाणी दुष्काळ पडतील.” —मत्तय २४:७.
“२०२३: आपल्या कुटुंबांना खायला-प्यायला देण्यासाठी ज्यांना खूप संघर्ष करावा लागतो, त्यांच्यासाठी एक आणखी भयानक वर्ष.” d
jw.org वर “ग्लोबल फूड क्रायसिस् फ्युल्ड बाय वॉर ॲन्ड क्लायमेट चेंज” हा इंग्रजीतला लेख पाहा.
“शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल.” —२ तीमथ्य ३:१.
“जगभरात राहणाऱ्या प्रत्येक आठ व्यक्तींच्या मागे एकाला मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत.” e
jw.org वर “नौजवानो मे बढती मायूसी और निराशा” हा हिंदीतला लेख पाहा.
२०२४ मध्ये आपण काय व्हायची अपेक्षा करू शकतो?
२०२४ मध्ये नक्की काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण जगातल्या घटनांवरून कळतं, की लवकरच देवाचं राज्य, म्हणजेच त्याचं स्वर्गातलं सरकार सगळ्या मानवी सरकारांची जागा घेईल. आणि हे सरकार सगळं दुःख आणि चिंता कायमच्या काढून टाकेल.—दानीएल २:४४; प्रकटीकरण २१:४.
पण तोपर्यंत, आपल्याला जेव्हा-जेव्हा चिंता वाटते, तेव्हा-तेव्हा आपण देवाची मदत घेतली पाहिजे. बायबल म्हणतं:
“मला भीती वाटते, तेव्हा मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.” —स्तोत्र ५६:३.
आपण देवावर भरवसा कसा दाखवू शकतो? भविष्यात दुःख नसेल असं बायबलमध्ये जे वचन देण्यात आलंय, त्याबद्दल आणखी शिकून घ्यायचं आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. बायबलमध्ये दिलेल्या वचनांमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो,हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मोफत केल्या जाणाऱ्या बायबलवरच्या चर्चेत भाग घेऊ शकता.
a फॉरन अफेर्स, “अ वर्ल्ड ॲट वॉर: व्हॉट इज बिहायन्ड द ग्लोबल एक्स्प्लोजन ऑफ व्हॉयलंट काँफ्लिक्ट?” एम्मा बील्स आणि पिटर सॅलिस्बरी, ३० ऑक्टोबर २०२३.
b अर्थक्वेक न्यूज, “ईयर २०२३: नंबर ऑफ मेजर अर्थक्वेक्स ऑन कोर्स फॉर रेकॉर्ड,” मे २०२३.
c युनायटेड नेशन्स, “सेक्रेटरी-जनरल्स ओपनिंग रिमार्क्स ॲट प्रेस काँफरन्स ऑन क्लायमेट,” २७ जुलै २०२३.
d वर्ल्ड फूड प्रोग्राम, “अ ग्लोबल फूड क्रायसिस.”
e वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन, “वर्ल्ड मेंटल हेल्थ डे,” १० ऑक्टोबर, २०२३.