व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या दानाचा वापर

सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक तयार करणं

सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक तयार करणं

१ जानेवारी, २०२१

 “मी १९ वर्षांपासून याची वाट पाहत होतो!” हा भाऊ नेमकी कशाची वाट पाहत होता? तो त्याच्या भाषेत, म्हणजे बंगाली भाषेत ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचं नवे जग भाषांतराची वाट पाहत होता. बऱ्‍याच जणांना नवे जग भाषांतर त्यांच्या भाषेत प्रकाशित होतं, तेव्हा असंच वाटतं. पण या बायबलचं भाषांतर कसं केलं जातं आणि ते प्रकाशित कसं केलं जातं, हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का?

 सगळ्यात आधी, नियमन मंडळाच्या लेखन समितीच्या मार्गदर्शनाखाली, भाषांतरकारांच्या टिमची निवड केली जाते. मग या टिमला बायबलचं भाषांतर करायला किती वेळ लागतो? न्यू यॉर्कच्या वॉरवीकमध्ये भाषांतर सेवा विभागात काम करणारे भाऊ निकलस अल्हाडिस म्हणतात: “बायबलचं भाषांतर करताना बऱ्‍याच गोष्टींचा विचार करावा लागतो. जसं की, भाषांतरासाठी किती भाषांतरकार उपलब्ध आहेत, त्या भाषेचं स्वरूप कसं आहे, ती जास्त किचकट आहे का, वाचकांना बायबल काळातल्या जीवनाची कितपत माहिती आहे आणि ती भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते का. सहसा फक्‍त ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचं भाषांतर करण्यासाठी एका टिमला साधारण एक ते तीन वर्षं लागतात. आणि संपूर्ण बायबलचं भाषांतर करायला अंदाजे चार किंवा त्यापेक्षा जास्त वर्षं लागतात. साइन लँग्वेज भाषेला तर यापेक्षा जास्त वेळ लागतो.”

 बायबलचं भाषांतर करण्यात फक्‍त भाषांतरकारांचीच नाही तर ती भाषा माहीत असलेल्या इतर भाऊबहिणींचीही गरज असते. हे भाऊबहीण वेगवेगळ्या ठिकाणांहून, इतकंच काय तर कधीकधी वेगवेगळ्या देशांतूनही असतात. भाषांतर बरोबर झालंय का आणि ते समजायला सोपं आहे का हे ते सांगतात. आणि हे काम ते कोणतेही पैसे न घेता स्वेच्छेने करतात. त्यांच्या मदतीने भाषांतरकारांना अचूक, स्पष्ट आणि समजायला सोपं असं भाषांतर करता येतं. दक्षिण आफ्रिकेतले बायबल भाषांतरकारांचे प्रशिक्षक म्हणतात: “देवाच्या वचनाचं भाषांतर करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे याची भाषांतरकारांना जाणीव असते. म्हणूनच ते या कामात खूप मेहनत घेतात.”

 भाषांतर झाल्यावर बायबलच्या छपाईचं आणि बाईंडिंगचं काम केलं जातं. यासाठी छापखाण्यात कमीत कमी १० गोष्टी वापरल्या जातात: कागद, शाई, कव्हरचं साहित्य, गोंद, कव्हर, चंदेरी रंग, रिबिन, हेडबँड, स्पाईन स्टीफनर्स आणि बायबलच्या बाईंडिंगसाठी कॅपिंगचं साहित्य. २०१९ मध्ये फक्‍त या सामानासाठीच दोन कोटी डॉलरपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आले. तसंच, छापखाण्यात काम करणाऱ्‍या भाऊबहिणींनी त्या वर्षी बायबल तयार करण्यासाठी आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी तीन लाखापेक्षा जास्त तास खर्च केले.

“बायबल हे आपण प्रकाशित करत असलेलं सर्वात महत्त्वाचं प्रकाशन आहे”

 मग या कामासाठी इतका वेळ आणि पैसा का खर्च केला जातो? आंतरराष्ट्रीय छपाई विभागाचे भाऊ जोएल ब्लू म्हणतात: “बायबल हे आपण प्रकाशित करत असलेलं सर्वात महत्त्वाचं प्रकाशन आहे. त्यामुळे ते जसं दिसतं त्यावरून आपण ज्या देवाची उपासना करतो त्याचा आणि आपण सांगत असलेल्या संदेशाचा गौरव व्हावा असं आम्हाला वाटतं.”

 सामान्य लोकांसाठी नवे जग भाषांतर तयार करण्यासोबतच, खास गरजा असलेल्या लोकांसाठीही आपण बायबल तयार करतो. उदाहरणार्थ, ब्रेल भाषेत नवे जग भाषांतर दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. ब्रेल भाषेत संपूर्ण बायबल तयार करायला जवळपास आठ तास लागतात आणि त्याचे बरेच खंड ठेवायला जवळपास ७.५ फूट जागा लागते. तसंच, तुरुंगातल्या कैद्यांसाठी आपण कागदी कव्हरचं बायबलसुद्धा तयार करतो.

 नवे जग भाषांतरामुळे लोकांचं जीवन बदलतं. काँगो प्रजासत्ताकमध्ये टोंबे नावाचं एक ठिकाण आहे. तिथे किलुबा भाषेची एक मंडळी आहे. टोंबे हे ठिकाण, त्या देशाच्या राजधानीपासून १,७०० किलोमीटर पेक्षा जास्त दूर आहे. तिथल्या भाऊबहिणींकडे किलुबा भाषेतलं एकच बायबल होतं आणि त्यातली भाषाही खूप जुनी होती. सभांमधले भाग तयार करण्यासाठी भाऊ ते बायबल आळीपाळीने वापरायचे. पण ऑगस्ट २०१८ पासून मंडळीतल्या प्रत्येकाकडे संपूर्ण नवे जग भाषांतर आहे आणि त्यातली भाषाही आजच्या काळातली आहे. त्यामुळे ती सगळ्यांना सहज समजते.

 जर्मन भाषा बोलणारी एक बहीण तिच्या भाषेतल्या नवे जग भाषांतराच्या सुधारित आवृत्तीबद्दल असं म्हणते: “मी आता स्वतःला बायबल वाचायची आठवण करून देत नाही. तर, बायबल परत कधी वाचता येईल याची मी वाट पाहते.” एका कैद्याने लिहिलं: “मला नवे जग भाषांतराची एक प्रत देण्यात आली. आणि खरंच ते वाचून माझं जीवन बदलतंय असं मी म्हणू शकतो. हे भाषांतर वाचून मला देवाचं वचन जितक्या चांगल्या प्रकारे कळतंय, तितकं आधी कधीच कळलं नव्हतं. मला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखी जाणून घ्यायचंय आणि मी एक यहोवाचा साक्षीदार कसा होऊ शकतो हेसुद्धा जाणून घ्यायचंय.”

 नवे जग भाषांतर तयार करण्यासाठी दानामुळे मदत होते. आणि जे लोक हे भाषांतर वाचतात त्यांना या दानाची खूप कदर आहे. जगभरातल्या कामासाठी दिलं जाणारं हे दान, donate.pr418.com या वेबसाईटवर दिलेल्या पद्धतींचा वापर करून दिलं जातं. खरंच, तुम्ही उदारतेने जे दान देता त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो!